नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने ‘5G नेटवर्क’ विरोधात केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी याचिका दाखल केल्याचे म्हणत दिल्ली उच्च न्यायालायने जुहीला फटकारले आहे. जुहीने सुनावणीची लिंक सोशल मीडियावर शेअर केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच कायद्याचा गैरवापर केल्यामुळे तिला २० लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
फिर्यादीनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला. यामुळं फिर्यादीवर 20 लाख रुपयांचा दंड लावण्यात येत आहे. हे प्रसिद्धीसाठी होतं असंही दिसतंय. जुही चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीचा लिंक प्रसारित केली, असं न्यायालयाने म्हटलं आहे. जुही चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीची वेब लिंक प्रसारित केली. हे लक्षात घेता प्रसिद्धीसाठी हा दावा दाखल करण्यात आला असल्याचे न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
जुहीने काही दिवसांपूर्वी 5G नेटवर्क विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. या तंत्रज्ञानामुळे मानवावर आणि पर्यावर्णावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचे तिचे म्हणणे होते. जुही सध्या पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे मानवी जीवनासह प्राणी आणि वनस्पतींवर दुष्परिणाम होऊ शकेल, अशी भीती जुहीने व्यक्त केली होती. त्यामुळेच तिने ही याचिका दाखल केली होती.