कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गचे विद्युतीकरण युद्धपातळीवर, प्रवास होणर केवळ चार तासांचा
कोल्हापूर / प्रतिनिधी
पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोल्हापूर ते मिरज मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मिरज ते सातारा मार्गाचे तसेच रेल्वेच्या सिग्नल व टेलीकॉम डिपार्टमेंटचे काम सुरु आहे. हे काम जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रेल सुरक्षा आयुक्त या मार्गाची तपासणी करुन रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल पाठवणार आहेत. रेल्वेमंत्रालयाने ग्रीन सिग्नल दाखविल्यानंतर हा मार्ग रेल्वेसाठी सुरु होणार आहे. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर मार्गावर जूननंतरच वीजेवर रेल्वेधावणार आहे. विद्युतीकरणाने रेल्वेला गती प्राप्त होणार असून कोल्हापूर ते पुणे पर्यंतचा प्रवास केवळ चार तासांचा होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी 513 कोटींचा निधी दिला आहे. विभागीय रेल्वे आणि पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑल इंडियामध्ये करार झाल्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आला. यानंतर कोल्हापूर ते पुणे 326 किमी मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम सुरु आहे. या रेल्वे मार्गावर सध्या ठिकठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी टेलिफोन विभागाचीही कामे रेल्वेने हाती घेतली आहेत. पुणे ते कोल्हापूर मार्गाच्या दूहेरीकरण आणि विद्युतीकरणच्या कामाने गती घेतली आहे.
विद्युतीकरणामुळे रेल्वे गतीमान
कोल्हापूर ते पुणे मार्गावर सध्या धावणाऱया डिझेल इंजीन रेल्वेगाडÎांना हे अंतर पूर्ण करण्यासाठी साधारणतः 7 ते 9 तासांचा अवधी लागतो. तर खासगी वाहन किंवा एसटी बसने प्रवास केल्यास हे अंतर चार ते पाच तासात पुर्ण होते. प्रवासास विलंब लागत असल्याने अनेक प्रवासी रेल्वेकडे पाठ फिरवत आहेत. मात्र विद्युतीकरणानंतर रेल्वेही गतीमान होणार आहे. कोल्हापूर पुण्याशी केवळ चार तासांत जोडणार आहे. तसेच विद्युकतीकरणामुळे डिझेल इंजीनवर होणाऱया खर्चामध्येही बचत होणार आहे. त्यामुळे भविष्यात यामार्गावर रेल्वेगाडÎांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
साताऱयात होणार प्रशासकीय कार्यालय
सातारा रेल्वे स्थानक परिसरात दुहेरीकरणा संदर्भातील प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अधिकारी, कर्मचाऱयांसाठी येथे निवासस्थाने बांधण्याचे कामही सुरु आहे. रेल्वेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱयांचे कार्यालय येथे होणार आहे. पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा कार्यभार या कार्यालयावर असणार आहे.
विद्युतीकरणाऱया कामाचा थोडक्यात आढावा
कोल्हापूर ते पुणे विद्युतीकरण कामाचे अंतर – 326 कि.मी.
विद्युतीकरणासाठी मंजुर निधी – 513 कोटी
कामाचा कालावधी – मार्च 2021
कामपूर्ण होण्याची कालावधी – जून 2021 शक्य
कोल्हापूर–पुणे विद्युतीकरणाचे मार्ग व सद्यस्थिती
मार्गाचे नाव अंतर सद्दस्थिती
कोल्हापूर ते मिरज 47 कि.मी. कामपूर्ण
मिरज ते शेणोली 53 कि.मी. कामपूर्ण
मिरज ते सातारा 134 कि.मी. काम युद्धपातळीवर सुरु
जेजुरी ते पुणे 32 कि.मी. कामपूर्ण
फुरसंगी ते पुणे 12 कि.मी. कामपूर्ण