महिन्याच्या आधारे 11 टक्के वाढ- ऑनलाइन व्यवहारांना मिळतेय गती
नवी दिल्ली
गेल्या जूनमध्ये डिजिटल देवाण-घेवाणीचे साधन असलेल्या यूपीएच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहारांमध्ये महिन्याच्या आधारे पाहता 11 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये अनेकांनी अनेक वस्तु या ऑनलाइन पद्धतीने मागवण्यावर भर दिला होता. याला अनुषंगून आजकाल अनेक पैशाचे देवाणघेवाणीचे व्यवहार हे ऑनलाइन युपीआय, पेटीएम, फोन पे अशा माध्यमातून होताना दिसत आहेत. याचाच फायदा युपीआय डिजिटल पेमेंट माध्यमाला उठवता आला. युपीआय डिजिटल माध्यमातून मागच्या जून महिन्यामध्ये 5 लाख 47 हजार कोटी रुपयांचे देवाण-घेवाणीचे व्यवहार करण्यात आले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी या संदर्भातील माहिती नुकतीच दिली आहे. गेल्या मेमध्ये युपीआयच्या माध्यमातून 4 लाख 91 हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. युपीआय व्यवहाराचा विचार करता 2.80 अब्ज जणांनी जूनमध्ये व्यवहार केले होते तर मे मध्ये ही संख्या हाती 2.53 अब्ज इतकी.