कर्ज मागणीत मोठी घसरण : आगामी काळात दबाव राहण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
जून तिमाहीत डिपॉझिटस्मध्ये वृद्धी झाल्याची नोंद करण्यात आली आहे तर दुसऱया बाजूला मोठय़ा रक्कमेच्या कर्ज मागणीत मात्र मोठी घसरण झाली असून लघुकर्जाच्या मदतीने बँकांचा व्यवहार सुरु असल्याची माहिती एका अहवालामधून देण्यात आली आहे.
जून तिमाहीत बँकांच्या कर्जात 67 टक्क्मयांची घसरण झाली आहे. परंतु बँकात जवळपास यादरम्यान रोख स्वरुपात होणाऱया डिपॉझिटस्मध्ये वाढ होत गेली आहे. जून तिमाहीत फक्त 423 मोठी कर्जे मंजुर झाली आहेत. हाच आकडा एक वर्षाच्या अगोदरच्या कालावधीत 1,285 इतका होता. यातील 79 कर्जे ही 500 कोटी रुपयांवर राहिली आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 3 जुलै रोजी समाप्त झालेल्या पंधरवडय़ापर्यंत बँकांचा पेडिट ग्रोथ हा 6.13 टक्के होता तर डिपॉझिटमध्ये 11.04 टक्क्मयांची वृद्धी नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच एकूण बँक कर्ज 96.97 लाख कोटींच्या दरम्यान राहिले आहे. डिपॉझिट 126.75 लाख कोटीच्या घरात पोहोचले आहे.
काही बँकांचे तिमाही अहवाल सादर झाले आहेत. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या कर्ज वृद्धीचा दर मंद राहिला आहे. हा मार्च जून या कालावधीत एक टक्क्मयांनी वधारुन 10.04 लाख कोटीवर राहिला आहे.