वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या कारणामुळे कंपन्यांचा महसूल घटल्याने बीएसई आणि एनएसईवर लिस्टेट 554 कंपन्यांनी चालू एप्रिल ते जून तिमाहीमध्ये आपल्या समभागधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. फायनान्शिअल सर्व्हीसेसच्या आकडेवारीनुसार 15 कंपन्यांनी एप्रिलमध्ये डिव्हिडंडवर विचार करणार असल्याची घोषणा केली आहे. यातील जवळपास 116 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मे मध्येच लाभांश देण्याचे जाहिर केले होते.
जूनमध्ये अन्य 423 कंपन्यांच्या संचालक मंडळाने डिव्हिडंडसाठी मंजुरी दिली आहे. तर विशेष बाब म्हणजे चालू व्यापारी वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लाभांश देण्यावर विचार करण्याची घोषणा करणाऱया जास्तीत जास्त कंपन्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप या वर्गातील आहेत.
कोरोना संकटामुळे दूरसंचार, औषध संस्था, आयटी आणि अन्य व्यापारी क्षेत्रात समाधानकारक कामगिरीची नोंद केली आहे. यामध्ये सदर सेगमेंटच्या कंपन्यांना लाभांश देण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. बँक एफडीसारख्या निश्चित उत्पन्नावर रिटर्न मिळणाऱया गुंतवणूकदारांसाठी निश्चित स्वरुपाने दिलासा मिळणार असल्याचे म्हटले आहे.
2019-20 मध्ये लाभांश दिलेल्या कंपन्या
मागील व्यापारी वर्षात 2019-20 मध्ये लाभांश देणाऱया कंपन्यांच्या संख्येमध्ये एक वर्षाच्या तुलनेत हलकी वाढ नेंदवण्यात आली आहे. मार्च 2020 मध्ये समाप्त झालेल्या व्यापारी वर्षात 882 कंपन्यांनी लाभांश दिला आहे. तर मार्च तिमाहीत देशात कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे हा लाभांश देण्याचे मागे राहिले होते. 2018-19 मध्ये 887 कंपन्यांनी लाभांश दिला होता. तर 2017-18 मध्ये 1,687 कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला होता.