बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांना चकीत केले आहे. रकुलने स्वतःच्या जन्मदिनी निर्माता जॅकी भगनानीसोबतच्या स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. रकुलने जॅकीसोबतचे एक छायाचिक्षे पोस्ट केले आहे. जॅकी माझ्यासाठी चालू वर्षातील सर्वात मोठे गिफ्ट असल्याचे तिने म्हटले आहे.
रकुलच्या या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी कॉमेंट केली आहे. यात डॉक्टरजी या चित्रपटात रकुलसोबत काम करणारा अभिनेता आयुष्मान खुराना, काजल अग्रवाल, राशी खन्ना आणि सोफी चौधरी यांचा समावेश आहे. जॅकीने देखील हेच छायाचित्र शेअर करत स्वतःच्या मनातल्या भावना मांडल्या आहेत.
याचदरम्यान रकुल लवकरच अक्षय कुमारसोबत जॅकीच्या प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱया चित्रपटात दिसून येणार आहे. त्यांनी अलिकडच चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. याचबरोबर रकुल अटॅक, मेडे, थँक गॉड, डॉक्टरजी आणि इंडियन 2 या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.