ऑनलाईन टीम / मुंबई :
इंजिनिअरींग प्रवेश परीक्षा जेईई मेनच्या चौथ्या सत्राचे निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केले. या परीक्षेत 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत, तर 18 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परीक्षा चार सत्रात घेण्यात आली होती. फेब्रुवारीत पहिले सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र, तिसरं सत्र 20-25 जुलैला तर चौथं सत्र 26 ऑगस्टपासून 2 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले होते. सत्र 1 मध्ये एकूण 6.61 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, सत्र 2 मध्ये 6.19 लाख उमेदवार, सत्र 3 मध्ये 7.09 लाख तर सत्र 4 साठी एकूण 7.32 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 18 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळाले आहेत.
जेईईई मेन 2021 ला बसलेले विद्यार्थी त्यांचे निकाल पाहण्यासाठी jeemain.nta.nic.in, nta.ac.in आणि ntaresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात.