नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जेईई ऍडव्हान्स्ड ही प्रवेश परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 या दिवशी घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. सोमवारी ट्विटरवरुन त्यांनी हा संदेश प्रसारित केला. ही परीक्षा कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रतील पूरग्रस्त आणि दरडी कोसळलेल्या भागातील विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेला बसण्याची आणखी एक संधी देण्यात येणार आहे. हे विद्यार्थी 25 आणि 27 जुलैच्या परीक्षेला बसू शकत नसल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेची तारीख नंतर घोषित करण्यात येणार आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, असे सांगण्यात आले.