ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई आणि नीट परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखारियाल यांनी आज केली.
ते म्हणाले, जेईई मेन परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 26 जुलै रोजी घेतली जाणार असं त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, जेईई ॲडव्हान्स परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा कधी घेतल्या जातील याबाबत येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, यावर्षी देशातील 15 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ‘नीट’साठी नोंदणी केली आहे. तर ‘जेईई’ परीक्षेसाठी नऊ लाखाहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे.