ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई आणि नीट परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा उद्या म्हणजेच 5 मे रोजी केली जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता नव्या तारखा उद्या घोषित केल्या जातील असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखारियाल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, यावर्षी देशातील 15 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ‘नीट’साठी नोंदणी केली आहे. तर ‘जेईई’ परीक्षेसाठी नऊ लाखाहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे.