ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीत प्रवेशासाठी द्यावी लागणारी जेईई ॲडव्हान्स (जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन) परीक्षा येत्या 23 ऑगस्ट रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाकडून करण्यात आली.
ते म्हणाले, याआधी ही परीक्षा 17 मे रोजी होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 23 ऑगस्ट रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा होणार आहे. यावर्षी 12 हजार 463 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
दरम्यान, जेईई मेन परीक्षा 18 ते 23 जुलैमध्ये होणार असल्याचे याआधीच सांगण्यात आले आहे.