अफगाणिस्तान – इराणमार्गे दाखल -महसूल विभागाची कारवाई
प्रतिनिधी / मुंबई :
जेएनपीटी बंदरात 300 कोटींचे हेरॉईन शनिवारी जप्त केले. महसूल विभागाने ही कारवाई केली. यामुळे एकच खळबळ माजली आहे. अफगाणिस्तानातून इराणमार्गे नवी मुंबईतील जेएनपीटी येथे दाखल झल्याची माहिती समोर आली असून याचा अधिक तपास सुरू असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांने सांगितले. महसूल विभागाने 300 कोटींची 290 किलो हेरॉईन जप्त केले आहे. नवी मुंबईतील उरणमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मधून हेरॉईनचा हा प्रचंड साठा जप्त केला आहे.
सीमाशुल्क विभागाने आता हे प्रकरण अँटी स्मगलिंग इंटेलिजेंस, इन्व्हेस्टिगेशन अँण्ड ऑपरेशन्स एजन्सीकडे सोपवले आहे. या प्रकरणात डीआरआय दोन जणांची चौकशी सुरु असल्याचे समजते. नवी मुंबईच्या उरण विभागाच्या एजन्सीकडून 300 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले असून यावर्षी पकडण्यात आलेल्या हेरॉईनचा हा सर्वात मोठा साठा आहे. जेएनपीटी बंदराच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱयांनी 290 किलो हेरोइन जप्त केले आहे.
मागील वर्षीही डीआरआयने 191 किलो हेरॉईन जप्त केले होते. तपासणीत करताना आढळलेले डोळ्यात धूळ टाकण्याचे आयुर्वेदिक औषध असल्याचे समोर आले होते. पंजाब पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अमृतसर जिह्यातील एका घरातून 191 किलो हेरॉइन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या भागामध्ये दोन अफगाण नागरिकांबाबत 6 जणांना अटक केली होती. दरम्यान, ईशान्य भारतातही ड्रग्सच्या तस्करीचा एक नवीन धोका समोर आला आहे. म्यानमारमधून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे पारंपारिक मार्ग बांगलादेश सुरक्षा दलांद्वारे जोरदारपणे राबविले जात आहेत. यात इस्लामिक विद्यार्थी संघटनांचा सहभागही आढळला आहे असे सुरक्षा आणि गुप्तचर संघटनांच्या अहवालात म्हटले आहे. म्यानमार येथून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली असून ते आता मणिपूरमार्गे आणि तेथून सिलचर आणि त्रिपुरामार्गे बांगलादेशात पोहोचली आहे. तर याचा अधिक तपास सुरू आहे.