ऑनलाइन टीम / मुंबई :
दीपिकाने जेएनयूत जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहेच. त्यातच आता या वादामुळे जाहिरात कंपन्या बॅकफूटवर गेल्या आहेत.
जाहिराती आणि चित्रपटांमधून देशात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून दीपिकाचे नाव घेतले जाते. पण ती जेव्हा जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सामील झाली, तेव्हा मात्र तिला जाहिरातीत घेणाऱया कंपन्यांनी कमालीची धास्ती घेतली आहे. अनेक ब्रॅण्ड्सनी दीपिकाच्या जाहिराती दोन आठडय़ांसाठी थांबवण्याचा किंवा कमी दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दीपिका सध्या ब्रिटानियाची गुडडे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाईन्स आणि ऍक्ससि बँकेसह 23 ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती करते. दीपिकाची मालमत्ता 103 कोटी रुपये आहे. एका सिनेमासाठी ती 10 कोटी रुपये तर जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेते, असं म्हटलं जातं.