ऑनलाइन टीम / पुणे :
जेनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील समाजकार्य विद्यार्थ्यांकडून वनदेवी मंदिर, कर्वेनगर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.
जेएनयूमधील पीडित विद्यार्थ्यांना पाठिंबा देत एकत्रितरित्या निषेधाचा कार्यक्रम या वेळी घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सामाजिक गाणी गात तसेच घोषणा देत गुंड प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांवर हल्ला केलेल्या गुंडांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्राध्यापिका अंजली मायदेव, प्रा. उज्ज्वला मसदेकर, प्रा. शर्मिला रामटेके, प्रा. डॉ. महेश ठाकूर तसेच मेधा सामंत, वैशाली गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रितेश बदर, स्नेहप्रभा थोरवे, झैद अत्तार, कैलास साळवे, अमृता जगदाळे, गौरव राऊत, नीलम गायकवाड, अमोह साठे, आकाश राठोड, ज्योतीराम इंगळे, अपूर्वा वीरदंडे, श्वेता कांबळे, राजेश मुळे, मंगेश कदम, मकबूल देशिंग, प्रेमला घोरपडे, भरत कांबळे आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.