ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
विद्यार्थ्यांवरील हल्ल्याबाबत दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्याशी अमित शाह यांनी चर्चा केली केली. तसेच पोलीस सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱयांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रविवारी चेहरे झाकून हातात लाठय़ा-काठय़ा, हातोडी, अशा प्रकारचे साहित्य घेऊन विद्यापीठाच्या वसतिगृहात घुसलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला. जखमींमध्ये विद्यार्थी संघटनांचे नेते आणि प्राध्यापकांसह 20 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.