नवी दिल्ली : जेएसडब्लू स्टीलचे कच्चे पोलाद उत्पादन ऑक्टोबरमध्ये 7 टक्क्यांनी वधारुन 13.38 लाख टनावर राहिले आहे. मागील वर्षात समान तिमाहीत कंपनीने 12.54 लाख टन कच्चे पोलाद उत्पादन केले होते. महिन्याच्या तुलनेत पाहता सप्टेंबर 2020 मध्ये 12.88 लाख टन उत्पादन घेण्यात आले होते, जे चार टक्क्यांनी अधिक राहिले आहे.
कंपनीचे लोखंडी पत्र्याच्या रोलचे उत्पादन ऑक्टोबर 2019 मध्ये 9.77 लाख टनासोबत 9.76 लाख टनावर राहिले आहे. मासिक आधारावर सप्टेंबरमधील उत्पादन 6 टक्के वाढीसह 9.20 लाख टन राहिले आहे. यासह ऑक्टोबरलाही या उत्पादनाने तेजी दर्शवली आहे.