नवी दिल्ली
जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत कच्च्या पोलादाचे संयुक्त उत्पादन 37 टक्क्यांनी वधारुन 59.8 लाख टनवर पोहोचले आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत कंपनीने 43.6 लाख टन पोलादाचे उत्पादन केले होते.
कंपनीने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार तिमाहीच्या आधारे हे उत्पादन 20 टक्क्यांनी वधारुन 50.1 लाख टनवर पोहोचले आहे. जे एक वर्षाच्या अगोदर समान कालावधी दरम्यान 41.9 लाख टन राहिले होते.
कंपनीने आर्थिक वर्षामध्ये 2021-22 च्या दरम्यान आपल्या संयुक्त पोलाद उत्पादनामध्ये 38 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्षाच्या दरम्यान हे उत्पादन 2.14 कोटी टन राहिले जे या अगोदरच्या आर्थिक वर्षात 1.55 कोटी टन राहिले होते.
महत्त्वाचे….
मार्चअखेच्या तिमाहीत 59.8 लाख टन उत्पादन
2021-22 आर्थिक वर्षात 2.14 कोटी टन उत्पादन