नवी दिल्ली
पोलाद उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलला एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये 5 हजार 904 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता पोलाद उत्पादक कंपनीने चांगला नफा पदरात पाडून घेतला आहे. याच कालावधीमध्ये मागच्या वषी कंपनीने एकत्रित तोटा सहन केला होता. कंपनीचा महसूल 145 टक्क्यांनी वाढून 28 हजार 902 कोटींवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली असून उत्पन्न 29 हजार 100 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीचा खर्च 20 हजार 804 कोटींवर आल आहे.