प्रतिनिधी /वास्को
अप्पर जेटी सडा मुरगांव येथील नागरिक रामा मेस्ता (80) सोमवारपासून बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबियांनी यासंबंधी मुरगांव पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.
सोमवारी ते घरातून बाहेर पडले होते. मात्र नंतर ते घरी परतलेच नाहीत. सर्वत्र शोधाशोध करूनही ते सापडत नसल्याने काल मंगळवारी मुरगांव पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. सदर व्यक्ती कुठेही आढळून आल्यास नजिकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.