ऑनलाईन टीम / मुंबई :
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची बलार्ड इस्टेट कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) ताब्यात घेतलं आहे. जेटच्या 12 वर्षांपासूनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. ईडीनं आतापर्यंत गोयल यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्याआधी बुधवारी सकाळी ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गोयल यांना ईडीच्या पथकानं ताब्यात घेऊन त्यांच्या घरी नेले आणि घराची झाडाझडती घेतली. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर वाचवण्यासाठी नरेश गोयल यांनी देशातील आणि पदेशातील कंपन्यांमध्ये देवाण-घेवाण केली होती. तसेच पैसा देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. अजूनही गोयल यांच्या घराची ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत.