मुंबई
विमान कंपनी जेट एअरवेज यांच्याकडून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर संजीव कपूर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी कंपनीकडून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजने श्रीलंकन एअरलाईन्सचे माजी सीईओ विपुल गुणतिलक यांना मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) पदावर नियुक्त केले होते.
जेट आता पुन्हा आपला व्यवसाय जोमाने सुरु करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. कर्जाचे ओझे वाढल्यानंतर कंपनीची उलाढाल मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाली होती.
विविध पदावर कार्यरत ः
संजीव कपूर हे याआधी ओबेरॉय हॉटेल्स ऍण्ड रिसॉर्टमध्ये अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांनी स्पाइसजेट, गोएअर तसेच विस्तारामधील विविध पदावर काम केल्याची माहिती आहे.