वृत्तसंस्था/ दोहा
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कतार खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेनीफर ब्रॅडीचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेनंतर ब्रॅडीचा हा पहिला पराभव आहे.
सोमवारी या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात इस्टोनियाच्या कोंटावेटने ब्रॅडीचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच ब्रॅडीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती पण जपानच्या ओसाकाने तिला पराभूत करून विजेतेपद मिळविले होते. कतार टेनिस स्पर्धेत ब्रॅडीला पहिली फेरी पार करता आली नाही.