मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील सुटय़ा भागांची निर्मिती करणारी कंपनी जेबीएम ऑटोने नुकतीच 500 इलेक्ट्रिक, सीएनजी बसेसची ऑर्डर प्राप्त केली आहे.
कंपनीने काही सीएनजी बसेसची ऑर्डर दिल्लीत, काही इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन तसेच झाशीतून इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर प्राप्त केली असल्याची माहिती आहे. कंपनीने 30 जूनअखेर 12.18 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे.