नो टाईम टू टायच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
हॉलिवूडची सुपरहिट प्रेंचाइजी ‘जेम्स बाँड’मध्ये पुन्हा डेनियल क्रेग मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. कोरोना महामारीमुळे चित्रपटाच्या प्रीमियरची तारीख टाळण्यात आली होती. तर जेम्स बाँडचा पुढील चित्रपट ‘नो टाईम टू डाय’च्या स्क्रीनिंगच्या तारखेची घोषणा आता करण्यात आली आहे.
जेम्स बाँडच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर ‘नो टाईम टू डाय’च्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. 28 सप्टेंबर रोजी मंगळवारी हा चित्रट प्रदर्शित होणार आहे. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन होणार आहे.
तर नो टाईम टू डाय हा चित्रपट अमेरिकेत 8 ऑक्टोबर रोजी झळकणार आहे. नो टाईम टू डा या चित्रपटासाठी 200 मिलियन युरोंचा खर्च आला आहे. या चित्रपटात ब्रिटिश गुप्तहेराच्या स्वरुपात डेनियल अखेरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. कोरोना संकटानंतर जागतिक स्तरावर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.