प्रतिनिधी / सातारा
पालिकेने विविध विभागात ठेक्याने काम करणारे अनेकजण कार्यरत आहेत. त्या कर्मचाऱयांना वेळेवर पगार मिळतो की नाही याबाबत मात्र कर्मचारी कोणाकडे तक्रार करताना दिसत नाहीत. परंतु नगरसेवक रवी ढोणे हे पालिकेत आले असताना अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईला जाण्यापूर्वी त्या पथकातील कर्मचाऱयांना वेतन वेळेवर मिळते काय?, अशी विचारणा करताच तेथेच उपस्थित असलेल्या ठेकदाराने कबुलीच दिली की त्यांचे पगार खात्यावर वेळेत केले जातात. त्या मुलांनीही वेळेवर पगार होतो असे सांगितले. दरम्यान, अचानक नगरसेवक रवी ढोणे यांनी तपासणी केल्यामुळे ठेकेदारांची क्षणभर तितरबितर झाली होती. सातारा पालिकेत वेगवेगळय़ा विभागात ठेकेदारांकडून कामे करवून घेतले जातात. त्यात वृक्ष विभागात बागांची निगा राखण्यासाठी उत्कर्ष ही संस्था आहे. आरोग्य विभागात बिगारी काम करतात. अतिक्रमण हटाव विभागाचेही पथकातले कर्मचारी हे बिगारीच आहेत. पथकातील कर्मचारी तोड म्हणले की तोडतात, याच कर्मचाऱयांना वेळेवर पूर्ण पगार दिला जातो काय याची उलटतपासणी नगरसेवक रवी ढोणे यांनी अचानक केली. पालिकेचे हे पथक बाहेर कारवाईला जात असताना त्यातील कर्मचाऱयांना ठेकेदाराच्या समक्षच पगार वेळेवर मिळतो काय?, करारानुसार ठरलेल्या सर्व बाबीनुसार पगार मिळतो काय अशी विचारणा केल्यावर त्या मुलांनी होय अशा माना डोलावल्या. त्याचवेळी तेथे त्या मुलांच्याकडून काम करवून घेणारा ठेकेदार होता. त्या ठेकेदाराने मुलांना पगार खात्यावर देतो. पीएफचेही पैसेही भरले जातात, असे सांगितले. त्या अचानक घडलेल्या प्रसंगाने मात्र ठेकेदारांची काही क्षणाकरता तितरबितर झाली होती.