अपघाताची घटना घडताच दुचाकीवरुन पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसाची धरली बकुटी
प्रतिनिधी/ सातारा
वेळ दुपारी सव्वा बाराची. ठिकाण पोवईनाका. एक दुचाकीस्वार पोलीस लिहिलेले हेल्मेट घालून तर दुसरा दुचारीस्वार पाठीमागे युवती बसलेली या दोघांच्यामध्ये पोवईनाक्यावर कोणाला काही कळायच्या आत अपघात झाला. अन् त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली युवती रस्त्यात तशीच पडली. एक दुचाकी तेथेच तर दुसरा दुचाकीस्वार हेल्मेटवर पोलीस लिहिलेला आपली दुचाकी बाजूला काढून पुढे नेण्याच्या प्रयत्नात असतानाच नागरिकांनी त्यास रोखले. दुसऱया दुचाकीस्वाराने त्या युवतीला सावरत नागरिकांच्या सहकार्याने झाडाच्या सावलीत बसवले. स्वतः निटनेटका होत त्या दुचाकीस्वारास बकुटीला धरुन आणले. हेल्मेटवर पोलीस पाहिल्यानंतर त्या दुचाकीस्वाराचा आवाज वाढला. त्यातच वाहतूक पोलीस आले होते. परंतु चूक कोणाची हे त्या पोलीस कर्मचाऱयास उमगल्याने त्यानेच त्या युवतीला रुग्णालयात नेण्याचे कबुल केले अन् त्यावर पदडा पडला.
साताऱयातल्या पोवईनाक्यावर ग्रेडसेपरेटर झाला असला तरीही वरुन जाणाऱया वाहनांना कोणतेही बंधन नाही. स्पीड ब्रेकर नाही. त्यामुळे येणारी वाहने कशीही येतात. अपघात सारखे घडू लागले आहेत. मुळात ग्रेड सेपरेटरमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आता सातारकरांना जाणवू लागल्या आहेत. शाहु चौकातुन स्टॅण्डकडेच जाता येते. स्टॅण्डकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना चुकुन कराडबाजूकडेही निघतात. त्यामुळे सहसा कोणीही ग्रेड सेपरेटरचा वापर करत नाही. तर ग्रेड सेपरेटरच्यावर भरधाव वेगाने वाहने येत असतात. त्या वाहनांचा वेग जादा असल्याने व कोणते वाहन कोठे जाते याला दिशास नसल्याने अपघात होत आहेत. त्यापैकीच एक प्रकार सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला.
दोन दुचाकीस्वारामध्ये अपघाताची घटना घडली. अन् एक दुचाकीवरील पाठीमागे बसलेली युवती रस्त्यातच पडली. दुसऱया दुचाकीवरील चालकाच्या डोक्यात पोलीस असे लिहिलेले हेल्मेट तर पायात पोलिसांचा बुट तरीही अपघात घडूनही न थांबता तेथून पोबारा करण्याच्या मनस्थितीत असल्याचे पाहून नागरिकांनी अडवले. तोपर्यंत त्या युवतीला नागरिकांनी उचलून झाडाच्या सावलीत आणून बसवले, पाणी पाजले. तोपर्यंत तो दुचाकी चालक सावध होवून त्या दुसऱया दुचाकी चालकाचे बकुटीला धरुन त्या युवतीच्या जवळ आणले. गाडी नीट चालवता येत नाही का लायसन आहे का असे प्रश्न करताच आपण पोलिसाला धरुन आणले ही बाब जेव्हा त्याला समजली तरीही चूक ती चूक म्हणून त्याने मागे न हटता पोलिसावाला दुचाकी कसा चुकीचा हे पटवून देताना पोलीसवालाही वरचढ करत होता. परंतु वाहतूक पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत चौकीत दोघेही चला असे म्हणताच त्या पोलिसवाल्या दुचाकीस्वाराने रुग्णालयातील खर्च देतो असे म्हणून त्या युवतीला रुग्णालयात नेले, असे प्रत्यक्ष बघ्यांनी सांगितले.