प्रतिनिधी / मुंबई
सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आज नागपाडा मुंबई येथे मुस्लिम नागरिकत्व सीएए विरोधात निदर्शने करीत असताना जेष्ठ छायाचित्रकार आशिष राजे यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान या घटनेचा सर्व छायाचित्रकारांनी निषेध केला आहे.