नवी दिल्ली
वाडिया ग्रुपचे जेह वाडीया यांनी गोएअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपद नुकतंच सोडलं आहे. आता कंपनीने बेन बालदांझा यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेले बालदांझा हे स्पिरीट एअरलाइन्सचे सीईओ होते. गोएअर लवकरच आपला आयपीओ बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. आपल्या कंपनीच्या व्यवस्थापनाला यायोगे मजबुती दिली जाणार आहे. कंपनी येणाऱया काळात 4 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे समजते. बालदांझा हे 2018 पासून कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत.