स्थानिकांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण करणार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. सोबत सहकार्य करणारी प्रेंच ऊर्जा कंपनी इलेक्ट्रिसिट डी फ्रान्स एसए (इडीएफ)स्थानिकांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प†िरपूर्ण करण्याच्या दिशेने काम करत आहे. यासाठी मुंबई येथे वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टीटय़ूट(व्हीजेटीआय)सहकार्याने प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती ईडीएफचे अध्यक्ष आणि सीईओ जीन बर्नार्ड लेव्ही यांनी एका मुलाखतीत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅरिस भेटीच्या निमित्ताने लेव्ही भारतात आले होते. त्यांनी प्रकल्पाला गती देण्यासाठी एनपीसीआईएलच्या वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधींची भेट घेतली.
लेव्ही म्हणाले की, ईडीएफ आणि एनपीसीआयएल प्रेंच ईपीआर तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पाच्या विकासावर सखोलपणे काम चालू आहे. जैतापूर प्रकल्प हा भारत-प्रेंच धोरणात्मक सहकार्याचा प्रमुख आधारस्तंभ आहे. मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या राष्ट्रीय उपक्रमांना प्रत्यक्षात आणण्यासाठी ईडीएफ सक्रियपणे गुंतले आहे. या प्रकल्प उभारणीसाठी अभियंते आणि तंत्रज्ञांची आवश्यकता असून त्यांना या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाईल, असे लेव्ही म्हणाले.
ईडीएफ मुंबईत आपले अणू अभियांत्रिकी प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी सज्ज होत आहे. अभियांत्रिकी आणि खरेदीतील 200 भारतीय कंपन्या आणि प्रकल्पासाठी पात्रता प्रक्रियेत असलेल्या डझनभर कंपन्यासह भारतीय पुरवठा साखळीत लक्षणीय क्षमता आहे. भारताच्या शाश्वत भविष्यासाठी आणि सकारात्मक पावले उचलण्यासाठी इडीएफ योगदान देत आहे.
मोदींच्या अलीकडील 4 मे रोजी पॅरिस येथे झालेल्या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी विश्वसनीय, परवडणारी आणि कमी कार्बन उर्जेच्या प्रवेशासाठी जैतापूर ईपीआर प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि गेल्या काही महिन्यांतील प्रगतीचे स्वागत केले. त्यांनी ईडीएफ आणि एनपीसीआयएलला पुढे जाण्यासाठी आणि नवीन प्रगती साधण्याचे आवाहन केले.
अत्याधुनिक आणि कुशल भारतीय अणुउद्योगाच्या सहभागामुळे जैतापूर प्रकल्पामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता आहे, भारताच्या धोरणानुसार ईडीएफ दशकाच्या अखेरीस आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता 45 टकके पेक्षा कमी आणि 2070 पर्यंत निव्वळ-शून्यपर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. ईडीएफ तंत्रज्ञानाचा पुरवठादार असेल तर एनपीसीआयएल ईपीआरच्या बांधकामासाठी जबाबदार असेल. या प्रकल्पामुळे भारतीयांना महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक फायदे मिळतील असेही लेव्ही म्हणाले.