प्रतिनिधी/ रत्नागिरी
ईडीएफ या फ्रेंच कंपनीने न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआयएल) जैतापूर अणूउढर्जा प्रकल्पासाठी 6 ईपीआर रिऍक्टर्स, अभियांत्रिकी अभ्यास आणि उपकरणे पुरवण्यासाठी आपला प्रस्ताव 22 एप्रिल रोजी सादर केला आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पातून उभारणीच्या काळात 27 हजारजणांना रोजगार उपलब्ध होईल तर कार्यवाहीच्या टप्प्यात अडीच हजार कायमस्वरुपी रोजगार निर्मितीचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. यामुळे जैतापूर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्याचे व लवकरच कार्यवाहीही गतिमान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
10 मार्च 2018 रोजी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान आणि प्रेंचचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत इंडियन वे फॉरवर्ड करारावर स्वाक्षऱया झाल्या होत्य़ा 2018च्या अखेरीस ईडीएफला प्रस्ताव सादर करणे बंधनकारक करण्यात आले होत़े या करारात जैतापूरच्या अणूभट्टय़ांसंदर्भात एनपीसीआयएलने पुरवलेली माहिती विचारात घेऊन अणूभट्टय़ांची विस्तृत तांत्रिक संरचना, सर्वसमावेशक कार्य, व्यावसायिक नियम व सहा अणुभट्टय़ांसाठी अभियांत्रिकी अभ्यास, उपकरणे आदी घटकांचा विचार करण्यात आला होता. ईडीएफ व एनपीसीआयएलच्या पूरक कौशल्यांवर आधारित हा प्रस्ताव असून प्रेंच आणि भारतीय अणु उद्योग यांच्यात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्याचे उद्दीष्ट आहे. ईडीएफने जैतापूर प्रकल्पासाठी ईपीआर तंत्रज्ञानासह स्टीम सप्लाय सिस्टम व 6 अणुभट्टय़ांच्या निर्मितीसाठी अभियांत्रिकी सहाय्य, उपकरणे या बाबत सांमजस्य करारात उल्लेख आहे. ईडीएफ एनपीसीआयएलच्या भविष्यातील ऑपरेटिंग टीमसाठी प्रशिक्षण सेवाही देणार आह़े
ईडीएफ या प्रकल्पात गुंतवणूकदार नाही किंवा बांधकामाची कोणतीही जबाबदारी नाही. बांधकाम, कार्यान्वयन, परवानग्या आदी जबाबदाऱया एनपीसायएल पाहणार आहे. मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या भारत सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ईडीएफ व त्याचे भागीदार प्रोत्साहित करणार आहेत़ या प्रकल्पासाठी पुरवठादार म्हणून सुमारे 200 भारतीय कंपन्या यापूर्वीच पात्र झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी मनुष्यबळ निर्मितीच्या उपक्रमाची कार्यवाही या आधीच सुरु करण्यात आली आह़े
या प्रकल्पाच्या रिऍक्टर व अनुषंगिक बाबी उभारणीच्या टप्प्यावर सुमारे 25 हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आह़े प्रकल्प कार्यान्वित झाल्यावरही सुमारे 2 हजार 700 लोकांना कायमस्वरुपी रोजगार निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उभारणी कार्यासाठी सुमारे 15 वर्षांचा कालावधी गृहित धरण्यात आला आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प फ्रान्स व भारत यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. 9.6 जीडब्ल्यूई स्थापित क्षमतेसह हा प्रकल्प जगातील सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प ठरणार आह़े
ईडीएफ समूहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जीन-बर्नार्ड लोवी यांनी या बाबत जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, जैतापूर प्रकल्पासाठी ईडीएफच्चा प्रस्ताव हे ईडीएफ कंपनी आणि प्रेंच अणुउद्योगासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. भारतीय सरकारच्या दृढनिश्चयाचे प्रतिबिंब असलेल्या या मोठय़ा प्रकल्पात योगदान देताना अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.