क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
जैन स्पोर्ट्स क्लब आयोजित जैन समाज मर्यादीत एमएसडी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जैन इलेव्हन, जैन स्पारटन्स, जैन ब्लास्टर व सुपर किंग्स संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धेत पहिल्या सामन्यात जैन शुटर्स संघाने जैन मुव्हीयर्स संघाचा 6 गडय़ांनी पराभव केला. दुसऱया सामान्यात जैन ब्लास्टर ने जैन पेन्ड्स संघाचा 3 गडय़ांनी पराभव केला. तिसऱया सामन्यात जैन स्पारटन्स संघाने जैन युनायटेडवर 13 धावांनी विजय मिळविला. चौथ्या सामन्यात जैन ब्लास्टर संघाने जैन सुपर किंग्स संघाचा 1 धावेने पराभव केला.
या स्पर्धेत गुणाच्या व धावांच्या सरासरीवर जैन इलेव्हन, जैन स्पारटन्स, जैन ब्लास्टर, जैन सुपर किंग्स संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मंगळवारी दोन उपांत्य व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षिस वितरणाने सांगता हाईल.