प्रतिनिधी / बेळगाव
जैन पत्रकार महासंघाच्या कर्नाटक राज्य विभागीय संयोजकपदी बेळगाव येथील पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांची निवड करण्यात आली आहे.
कलमनी हे मागील 22 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते हळ्ळीय संदेश या दैनिकाचे संपादक आहेत. महासंघाच्या गुरुवार दि. 10 रोजी जयपूर येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश जैन तिवारिया व राष्ट्रीय महामंत्री उदयभान वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.