क्रीडा प्रतिनिधी :
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जैन समाज मर्यादित एमएसडी क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्य़पद जैन सुपर किंग्स संघाने संपादन केले. जैन साकरीया संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम सामन्यानंतर जैन सुपर किंग्स संघाने जैन साकरीया संघाचा 12 धावांनी पराभव केला. बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून शांतीलाल पोरवाल, प्रकाश पोरवाल, आनंद खोडा, राजेश संचेती, राकेश कटारिया, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे व पुरस्कृत्यांचे स्वागत करण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार अतुल पोरवाल तर स्पर्धेतील सर्वोकृष्ट फलंदाज राजू भडांरी, सर्वोकृष्ट गोलंदाज दर्शित जैन मालीकावीर पुरस्कार अमन चोप्रा या क्रिकेटपटूंना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी विजेत्या उपविजेत्या संघातील क्रिकेटपटूंना सुवर्ण, रौप्यपदक व चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पंच म्हणून सुनिल देसाई, रवी कणबर्गी यांनी काम पाहिले समालोचन प्रमोद जपे तर स्कोरर राजू जैन यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार जयपाल यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जैन समाज समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.