ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारताला आणखी एक लस मिळाली आहे. अमेरिकेची फार्मा कंपनी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ला सिंगल डोस लसीच्या आपत्कालीन वापराला भारत सरकारकने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही लस भारतीयांना उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भारतात सध्या भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’, सीरमची ‘कोविशिल्ड’ आणि रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसींचा वापर केला जात आहे. आता ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लसीला भारतात परवानगी मिळाली असून, ती कोरोनाविरुद्ध वापरली जाणारी देशातील चौथी लस आहे. लवकरच ही लस भारतीयांच्या सेवेत येणार असून, या लसीचा फक्त एक डोस पुरेसा असणार आहे.