ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीनुसार करण्यात आलेल्या फेर मतमोजणीत डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हेच विजयी ठरले आहेत.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे बायडेन 279 इलेक्ट्रोल मतांनी विजयी झाले. तर ट्रम्प यांचा पराभव झाला. ट्रम्प यांनी पराभव अमान्य करत मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच जॉर्जियासह चार प्रांतात फेरमतमोजणीची मागणी केली होती. मॅन्यूअली पद्धतीने केलेल्या या मतमोजणीचे निकाल गुरुवारी हाती आले. त्यामध्ये पुन्हा बायडेनच विजयी झाले. त्यामुळे ट्रम्प यांना पुन्हा धक्का बसला.
दरम्यान, अमेरिकेतील मतमोजणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. उर्वरित राज्यातील मतमोजणीची प्रक्रिया 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 20 जानेवारीला बायडेन यांचा शपथविधी होणार आहे.