वृत्तसंस्था/ लंडन
2020 सालातील इंग्लंडमध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बहुमान लिव्हरपूल संघाचा कर्णधार जॉर्डन हेंडरसनने पटकावला आहे. लिव्हरपूल संघाने दोन दिवसांपूर्वी प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱया लिव्हरपूल संघाच्या यशामध्ये तीस वर्षीय हेंडरसनचा वाटा महत्त्वाचा ठरला होता. प्रत्येक वषी इंग्लंडमधील फुटबॉल रायटर्स संघटनेतर्फे सर्वोत्तम फुटबॉलपटूची निवड केली जाते. विविध व्यक्तींकडून या पुरस्कारासाठी मते मागविली जातात. त्यामध्ये हेंडरसनला सर्वाधिक मते मिळाली. इंग्लंडच्या सर्वोत्तम पहिल्या पाच फुटबॉलपटूंमध्ये मँचेस्टर सिटीचा डी. ब्रुने, मँचेस्टर युनायटेडचा मार्कूस रेसफोर्ड, लिव्हरपूलचे व्हॅन डिजेक आणि सॅडिओ मॅनी यांचा समावेश आहे.