1 एप्रिलपासून रेशनवर करणार वितरण
बेळगाव : अंत्योदय कार्डधारकांना आता रेशनकार्डवर जोंधळय़ाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जोंधळा खरेदी करण्याचे काम सुरू असून यासाठी अतिरिक्त खरेदी केंदे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
1 एप्रिलपासून अंत्योदय कार्डधारकांना जोंधळा वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हय़ात 1 लाख 20 हजार मेट्रिक टन इतका जोंधळा खरेदीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी संकेश्वर, निपाणी, गोकाकमध्ये खरेदी केंदे सुरू करण्यात आली असून उर्वरित तालुक्मयात टीएपीसीएमएस व पीएसीएस सोसायटय़ांमधून खरेदी केंदे उघडण्यात आली
आहेत.
बैलहोंगल तालुक्मयात 12, बेळगाव तालुक्मयात 4, हुक्केरी तालुक्मयात 9, सौंदत्ती तालुक्मयात 6, रामदुर्ग तालुक्मयात 5, गोकाक तालुक्मयात 6, अथणी तालुक्मयात 8, चिकोडी तालुक्मयात 3 अशी एकूण 53 खरेदी केंदे सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा. एका शेतकऱयाकडून प्रतिएकर खरेदीचे किमान उद्दिष्ट 15 क्विंटल इतके ठरविण्यात आले आहे. हायब्रीड व मालदंडी जोंधळा खरेदी करण्यात येत आहे.