वृत्तसंस्था/ लंडन
सर्बियाचा टॉप सीडेड पुरूष टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने रविवारी विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. चालू वर्षांअखेरीस होणाऱया एटीपीच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरणारा जोकोविच पहिला टेनिसपटू आहे.
रविवारी विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत जोकोविचने इटलीच्या बेरेटीनीचा अंतिम सामन्यात पराभव करत सहाव्यांदा विंबल्डन करंडकावर आपले नाव कोरले. 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया एटीपीच्या अंतिम स्पर्धेसाठी जोकोविचने सर्वप्रथम आपली पात्रता सिद्ध केली आहे. जोकोविचने आतापर्यंत 13 वेळा एटीपीच्या अंतिम स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. 2021 च्या टेनिस हंगामामध्ये 34 वर्षीय जोकोविचने 37 पैकी 34 सामने जिंकले आहेत.