वृत्तसंस्था/ रोम (इटली)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सीडेड जोकोविच, जर्मनीचा व्हेरेव्ह आणि ग्रीसचा सित्सिपस यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. स्वीसच्या वावरिंकाचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
या स्पर्धेत गुरूवारी झालेल्या एकेरीच्या सामन्यात जोकोविचने वावरिंकाचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात जर्मनीच्या तृतीय मानांकित व्हेरेव्हने ऍलेक्स डी मिनॉरचा 6-3, 7-6 (7-5), ग्रीसच्या सित्सिपसने रशियाच्या कॅचेनोव्हचा 4-6, 6-0, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सर्बियाच्या जोकोविचला या विजयासाठी 80 मिनिटे झगडावे लागले. क्रेजीनोव्हीक आणि इटलीचा सिनेर यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर सित्सिपसचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना हेईल. त्याचप्रमाणे गॅरीन आणि सिलीक यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर व्हेरेव्हचा पुढील फेरीतील सामना होणार आहे.