भूपाळी संघ दुसऱया स्थानी तर मारवा संघाने मिळविला तृतीय क्रमांक
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटी प्रायोजित रसिक रंजन आयोजित ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ स्पर्धा रविवारी पार पडली. या स्पर्धेत ‘जोग’ या संघाने विजेतेपद पटकाविले. भूपाळी हा संघ दुसऱया स्थानी तर मारवा हा संघ तिसऱया स्थानी पोहोचला. जोग संघाच्या काजल धामणेकर, अनिस अहमद कित्तूर व काजल पाटील यांना गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगामची अंतिम फेरी रविवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडली. अंतिम फेरीसाठी चार संघ दाखल झाले होते. विविध प्रकारातील 48 गाणी सादर करण्यात आली. सर्व गाणी झाल्यानंतर परीक्षकांनी आपला निकाल जाहीर केला. सर्वोत्कृ÷ गायक जोग संघाचा अनिस अहमद कित्तूर तर सर्वोत्कृ÷ गायिका जोग संघाची काजल धामणेकर यांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते या दोघांनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरणावेळी मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले, माझे बेळगावशी जुने नाते आहे. माझे आजोळ खानापूर तालुक्मयातील लोंढा येथे असल्याने मागील अनेक वर्षांपासून माझा बेळगावशी ऋणानुबंध आहे. गोमंतकीय हे बेळगावकरांचे हृदय असून, आम्हाला दिला जाणारा आदरातिथ्य आम्ही केव्हाही विसरणार नाही. बेळगावमधून गोव्याला जाणारे अनमोड व चोर्ला हे दोन्ही रस्ते लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी या कार्यक्रमावेळी दिले.
बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी लोकमान्यचे संचालक विठ्ठल प्रभू, अजित गरगट्टी, सेवंतीलाल शहा, प्रा. अनिल चौधरी, प्रभाकर पाटकर, पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी भारती कित्तूर, आर. आर. कुलकर्णी व अनिल चौधरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नितीन कपिलेश्वरी यांनी रसिक रंजन व लोकमान्य परिवारतर्फे मनोगत व्यक्त केले. अनिल चौधरी यांनी संपूर्ण स्पर्धेविषयी माहिती दिली. बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन लोकमान्यचे समन्वयक विनायक जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया हुद्दार यांनी केले. कार्यक्रमासाठी तरुण भारत मिडिया पार्टनर तर हॉटेल समुद्र हॉस्पिटॅलिटी पार्टनर होते. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने रसिक उपस्थित होते.