प्रतिनिधी/ बेळगाव
शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात सोमवारी काळभैरव जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काळभैरवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच जोतिबा मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती.
सकाळी 7 वाजता पाद्यपूजा, त्यानंतर महाअभिषेक, महाभोग व आरती करण्यात आली. सायंकाळी 6 वाजता काळभैरव जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने पाळणा म्हणून काळभैरव जन्मोत्सव साजरा झाला. महाआरतीनंतर प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली.