तालुक्यात लहान-मोठे अनेक धबधबे : मात्र पर्यटकच अनभिज्ञ, प्रशासनाचे दुर्लक्ष
रामनगर / वार्ताहर
जोयडा तालुका हा नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. जोयडा तालुक्मयातील कित्येक पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अशी पर्यटनस्थळे आहेत परंतु त्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. येथे उन्हाळय़ात वाहणारे अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. मात्र, सदर धबधबे केवळ स्थानिकानाच माहीत असतात. असाच एक धबधबा म्हणजे शिंगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील कुडुलगावच्यानजीक आहे.
सदर धबधबा रामनगरहून 15 किलोमीटर अंतरावर असून कुडुलगाव गावापर्यंतच वाहने जातात व तेथून अडीच ते तीन किलोमीटर पायी चालत जावे लागते व निसर्गाच्या सानिध्यातून चालत जाऊन पुढे सदर धबधब्याचा आनंद घेता येतो. असे अनेक धबधबे तालुक्मयात असून त्या ठिकाणचा विकास होणे गरजेचे आहे. तसेच पर्यटकांना अशा पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणेही आवश्यक आहे. येथे येणाऱया बाहेरील पर्यटकांना जोयडा तालुक्मयातील गणेशगुढी येथील राफ्टिंगबद्दल अधिक माहिती आहे. परंतु अशा आकर्षक धबधब्यांविषयी पर्यटकांना काहीच माहिती नाही. त्यामुळे येथील माहिती पर्यटकांनपर्यंत पोहोचल्यास येथील स्थळांचाही विकास होईल. व पर्यटकांची गर्दी वाढू शकते. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळू शकतो.