प्रतिनिधी /बेळगाव
ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई विद्यालयात सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय योग क्रीडा फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षा आरती संकेश्वरी, खजिनदार अमोल जैन, पतंजली योग समिती मंडळ प्रभारी किरण मन्नोळकर, योगगुरु केशव कुलकर्णी, प्रभाकर लाटूकर, योगतज्ञ प्रतिभा धामणेकर व कल्याणी देसाई आदींनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. सूर्यनमस्कारामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होण्यास मदत होते. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शाळेचे प्रशासक डॉ. गोविंद वेल्लींग व क्रीडा शिक्षक अविनाश पाटील उपस्थित होते.