प्रतिनिधी / बेळगाव
“तरूण भारत ट्रस्ट”संचलीत “ज्ञान प्रबोधन मंदिर” या विद्यालयाचा दहावी चा निकाल 91.07% लागला आहे. या परीक्षेमध्ये कुमारी रक्षिता कडुर या विद्यार्थिनीने 92 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला.तर कुमारी नेहा धावणे हिने 91.84 टक्के आणि कुमारी श्रावणी पाटील हिने 91.04 टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा असे क्रमांक पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेच्या प्राचार्या सौ मंजिरी रानडे, प्रशासक डॉ .गोविंद वेल्लींग, आणि सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्वांतर्फे तसेच शाळेच्या संचालक मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.