बेळगाव : ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई शाळेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग, प्राचार्या मंजिरी रानडे, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख प्रणीता वेर्णेकर व प्राथमिक विभागप्रमुख प्रतिभा जवळकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांशी संवाद साधत प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग यांनी तसेच शिक्षिका ज्युली व अर्चना यांनी शास्त्री व महात्मा गांधींविषयी माहिती दिली. यावेळी संगीत शिक्षिका चंद्रज्योती यांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले.