बेळगांव मधील “तरूण भारत ट्रस्ट”संचलीत “ज्ञान प्रबोधन मंदिर” या ‘आय सी एस ई’ विद्यालयाचा दहावी चा निकाल या वर्षीही 100% लागला आहे. या शाळेने तब्बल सलग आठ वेळा हे उज्वल यश प्राप्त केले आहे.
या परीक्षेमध्ये कुमार वैष्णव वेर्णेकर 96.67 % गुण मिळवुन प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले.
तर कुमार अथर्व चंदगडकर याने 94.17%
व कुमार स्नेहांशु गुंजल याने 93.17% गुण मिळवून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा असे क्रमांक पटकावले.
या वर्षी शाळेच्या ICSC विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 80 विद्यार्थी बसले होते. त्यामधील कांही विद्यार्थ्यांचे 7 ते 8 पेपर यशस्वीरित्या पार पडले..
तर कांही विद्यार्थ्यांचे 2-3 पेपर covid 19 मुळे पुढे ढकलण्यात आले होते ..
80 विद्यार्थ्यांपैकी
11 विद्यार्थ्यांनी 90% हुन अधिक
30 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांहून अधिक
33 विद्यार्थ्यांनी 60% पेक्षा जास्त गुण मिळवुन प्रथम श्रेणी
मिळविली ..आणि 6 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले ..
विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेच्या प्राचार्या सौ मंजिरी रानडे , प्रशासक डॉ .गोविंद वेल्लींग, आणि सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या सर्वांतर्फे तसेच शाळेच्या संचालक मंडळातर्फे सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले .