ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील एका नवनिर्वाचित भाजप आमदाराचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. या आमदाराने असे म्हटले की, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी त्यांना मतदान केले नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी त्यांच्याकडे जाऊ नये.
“तुम्ही मला मतदान केले नसेल तर माझ्याकडे मदतीसाठी येऊ नका… ज्यांनी मला मत दिले आहे त्यांनाच मी मदत करेन,” असे बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दिनेश रावत यांनी एका सभेला संबोधित करताना जाहीरपणे सांगितले. सोमवारी रावत यांनी संबोधित केलेल्या सभेचा व्हिडिओ सोशल मीडिया साइटवर व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा माध्यमात