ऑनलाइन टीम /बारामती :
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार आज प्रथमच बारामतीत आले. त्यांचे बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले.
अजित पवार शहरात आल्यानंतर मुख्यरस्त्यावरून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. भव्य हार, तुरे, फुलं यांची बरसात अजित पवारांवर करण्यात आली. क्रेनच्या साह्याने प्रचंड मोठे हार अजित पवारांना घालण्यात आले. आपण या स्वागताने भारावून गेल्याचे पवारांनी भाषणात सांगितले.
अजित पवार म्हणाले, ज्यांनी मला प्रचंड मतदान केलं, त्यांचा हा सत्कार आहे. 1 लाख 65 हजारांचं मताधिक्य विधानसभेला मिळणं ही मोठी गोष्ट आहे. एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं. हा सर्व बारामतीकरांनी केलेला नागरी सत्कार आहे. हा एकटय़ा अजित पवारांचा सत्कार नाही. बारामती हे एक कुटुंब आहे. हा इथल्या घराघरातल्या प्रत्येकाचा सत्कार आहे.
तसेच बारामतीकरांनी फक्त मलाच नाही तर रोहित पवारांनाही निवडून देण्यासाठी जीवाचं रान केलं आहे, असंही ते म्हणाले.