तेलगू चित्रपटात पुन्हा दिसून येणार अभिनेत्री
राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात भूमिका साकारल्यावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने आणखीन एक तेलगू चित्रपट स्वीकारला आहे. आलिया आता दक्षिणेतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरताला शिवा हे करत आहेत.
शिवा हे ज्युनियर एनटीआरचे मित्र देखील आहेत. यापूर्वी या दोघांनी 2016 साली ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जनता गॅरेज’मध्ये काम केले होते. ‘आरआरआर’मध्ये काम केल्यावर ज्युनियर एनटीआर आणि आलिया यांच्यात उत्तम मैत्री झाली आहे. आरआआर या चित्रपटात या दोघांसोबत राम चरण आणि अजय देवगण देखील दिसून आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
आलिया याचबरोबर रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याचबरोबर आलिया रणबीर सिंगसोबत एका चित्रपटात काम करत आहे. संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलियाने मुख्य भूमिका साकारली असून त्याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.