प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावातील नामांकित ज्येष्ट फुटबॉलपटू सोमवारपेठ येथील रहिवासी महावीर मधुकर लेंगडे (वय 47) यांचे गुरुवारी रात्री गोवा येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. महावीर लेंगडे यांनी सेंट पॉल्स स्कूलच्या फुटबॉल संघात खेळताना प्रतिष्ठेची रायस्टिन गोम्स, फादर ए. डी., शिक्षण खात्याची फुटबॉल स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पदवीपूर्व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा तर गोगटे महाविद्यालय संघाचे कर्णधारपद तसेच युनिव्हर्सिटी ब्लू हा किताब त्यांनी पटकाविला होता. त्याचप्रमाणे स्थानिक बेळगाव जिल्हा साखळी वरिष्ट फुटबॉल स्पर्धेत टीएफसी व टीएफए संघाकडून खेळताना अनेक सामने जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने फुटबॉल वर्तुळात दुःखाचे सावट पसरले आहे.